काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून टार्गेट किलिंगचे हत्यासत्र सुरूच

छिन्नविच्छिन्न झालेला मीर यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळला
काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून टार्गेट किलिंगचे हत्यासत्र सुरूच

काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून केले जाणारे टार्गेट किलिंगचे हत्यासत्र अद्याप सुरूच असून पुलवामाच्या पंपोर भागात शुक्रवारी अतिरेक्यांनी जम्मू-काश्मीरातील पोलिस उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांची गोळी झाडून हत्या केली. छिन्नविच्छिन्न झालेला मीर यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळला.

अमरनाथ यात्रा काही दिवसांत सुरू होणार असून अशाप्रकारचे हल्ले करून दहशतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात प्रामुख्याने बिगर काश्मिरी व्यक्तींवर निशाणा साधला जात आहे. गेल्या महिन्यापासून काश्मीरमध्ये अतिरेकी स्थानिक, बिगर स्थानिक नागरिक आणि सुरक्षा जवानांवर निशाणा साधत आहेत. काश्मिरात मे-जूनमध्ये आतापर्यंत ९ जणांनी अतिरेकी हल्ल्यांत प्राण गमावले आहेत. यामध्ये ४ पोलिस आहेत. २ जून रोजी कुलगाममध्ये राजस्थानच्या बँक व्यवस्थापकाची हत्या केली. ३१ मे रोजी कुलगाममध्येच शिक्षिका रजनी बाला यांची गोळी झाडून हत्या केली. या हल्ल्यानंतर काश्मिरी हिंदूंनी पलायनास सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in