थायलंडमध्ये पाळणाघरात माथेफिरूच्या गोळीबारात २४ मुलांसह ३७ जण ठार

पत्नी व मुलांनाही ठार करून हल्लेखोराने स्वतःही केली आत्महत्या
थायलंडमध्ये पाळणाघरात माथेफिरूच्या गोळीबारात २४ मुलांसह ३७ जण ठार

थायलंडमधील नोंग बुआ लाम्फू प्रांतातील एका पाळणाघरात गुरूवारी एका माथेफिरूने केलेल्या बेछूट गोळीबारात २४ मुलांसह तब्बल ३७ जणांचा बळी गेला. हा माथेफिरू माजी पोलीस कर्मचारी होता. त्याने पाळणाघरावर हल्ला केल्यानंतर तेथून पळ काढला व घरी जाऊन पत्नी आणि मुलांचीही गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून त्याने आत्महत्या केली.

या घटनेचे काही व्हिडिओ उजेडात आलेत. त्यात नागरिक गोळीबारापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत. हल्लेखोर थायलंड पोलिसांचा माजी कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे. अंमली पदार्थ प्रकरणी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, 34 वर्षीय पन्या कामराब नामक व्यक्तीने हा हल्ला केला आहे. हल्लेखोराला मादक पदार्थांच्या तस्करीत हात होता. त्यामुळे त्याची पोलिस दलातून हकालपट्टी करण्यात आली होती.

2020 मध्येही गोळीबाराची घटना

2020 मध्ये एका सैनिकाने 29 लोकांना ठार केले. तसेच या घटनेत 57 जण जखमी झाले होते. सैनिक मालमत्तेच्या व्यवहाराचा त्याला राग होता. त्याने चार ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in