'तभी तो सभ मोदी को चुनते है'; नड्डांकडून भाजप थीम गीताचे अनावरण

हे गीत हिंदी भाषेत असून पंतप्रधान मोदी यांनी सत्ता मिळाल्यापासून कशा प्रकारे जनतेची स्वप्नपूर्ती केली ते या गीतातून सांगण्यात आले आहे.
'तभी तो सभ मोदी को चुनते है'; नड्डांकडून भाजप थीम गीताचे अनावरण

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत सपने नही हकीकत बुनते है, तभी तो सब मोदी को चुनते है, हे गाणे देशभर गुंजणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत या गाण्याचे गुरुवारी अनावरण केले.

हे गीत हिंदी भाषेत असून पंतप्रधान मोदी यांनी सत्ता मिळाल्यापासून कशा प्रकारे जनतेची स्वप्नपूर्ती केली ते या गीतातून सांगण्यात आले आहे. गीताची सुरुवात सपने नही हकिकत बुनते है, तभी तो सब मोदी को चुनते है या ओळींनी करण्यात आली आहे. मोदींनी प्रथम सत्ता हाती घेतली तेव्हा देश अत्यंत बिकट परिस्थितीत होता. पण मोदींनी या देशाचा आता कायापालट केला आहे. या गीतातून मोदी की गॅरंटी प्रतिबिंबित होत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या प्रसंगी नड्डा म्हणाले की, मोदी स्वप्ने सत्यात परिवर्तीत करतात. उभरत्या पिढ्यांची स्वप्ने आणि आश्वासनपूर्तीची हमी देतात. तब्बल ५०० वर्षांपासूनचे स्वप्न देखील त्यांनी पूर्ण करून दाखवले आहे. या गीताचीच थीम धरून अन्य अनेक मोहिमांची आखणी करण्यात आल्याचेही नड्डा यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच आणखी एक फूट टॅपिंग व लोकप्रिय गीत प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच डिजिटल होर्डिंग, बॅनर्स, चित्रपट व जाहिराती टप्प्याने प्रसारित करण्यात येणार आहे, असेही नड्डा यांनी यावेळी सांगितले. सर्व प्रकारच्या जाहिरातीत मोदी यांनी विविध क्षेत्रात कशा प्रकारे यश संपादन करून आपली आश्वासने पूर्ण केली आहेत ते दाखवून देण्यात येणार आहे. ते पुन्हा पुन्हा जनतेची स्वाभाविक निवड आहेत, असेही नड्डा यांनी नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in