5G स्पेक्ट्रम लिलाव चौथ्या दिवशीही सुरु राहणार, दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

बुधवारी लिलवाच्या दुसऱ्या दिवशी बोलीच्या नऊ फेऱ्या झाल्या. त्यात १.४९ लाख कोटींची बोली लावण्यात आली
5G स्पेक्ट्रम लिलाव चौथ्या दिवशीही सुरु राहणार, दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

5G स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया चौथ्या दिवशी शुक्रवारीही सुरु राहणार आहे. गुरुवारी लिलावाच्या तिसऱ्या दिवशी १,४९,६२३ कोटींची बोली लावण्यात आली. दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी सांगितले की, तीन दिवसात १६ फेऱ्या झाल्या आहेत. लिलवाची ही प्रक्रिया चौथ्या दिवशीही सुरु राहणार आहे. दूरसंचार उद्योग ग्रामीण भागात ५जी सेवा नेण्यास बांधील आहे, असेही मंत्री म्हणाले.

तर बुधवारी लिलवाच्या दुसऱ्या दिवशी बोलीच्या नऊ फेऱ्या झाल्या. त्यात १.४९ लाख कोटींची बोली लावण्यात आली, अशी माहिती दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सायंकाळी दिली होती. तर याआधी मंगळवारी पहिल्या दिवशी चार फेऱ्यांमध्ये कंपन्यांनी अंदाजापेक्षा १.४५ लाख कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. मंगळवारी दूरसंचार मंत्रालयाने 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू केला. पहिल्या दिवशीच्या स्पेक्ट्रम लिलावात सरकारकडून सांगण्यात आले की, 5G स्पेक्ट्रम लिलावादरम्यान कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त बोली लावली.

सरकारकडून सांगण्यात आले की, लिलावाच्या पहिल्या दिवशी झालेल्या बोलीच्या चार फेऱ्यांमध्ये सरकारला १.४५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्पेक्ट्रमसाठी बोली प्राप्त झाली.

पहिल्या दिवसाच्या स्पेक्ट्रम लिलावानंतर केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, भारतात होणाऱ्या पहिल्या लिलावात पहिल्याच दिवशी कंपन्यांनी लावलेल्या बोलींनी १.४५ लाखांचा टप्पा गाठला आहे. २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया पहिल्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बोलीच्या चार फेऱ्या पार पडल्या. 5G स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी ७०० मेगाहर्ट्झ बँड फ्रिक्वेन्सीसाठी बोली प्राप्त झाल्या होत्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in