अ‍ॅम्बेसिडर कार नव्या अवतारात पुन्हा बाजारात येणार

अ‍ॅम्बेसिडर कार नव्या अवतारात पुन्हा बाजारात येणार
Published on

अ‍ॅम्बेसिडर कार नव्या अवतारात पुन्हा बाजारात येण्याची शक्यता आहे. यासाठी हिंदुस्तान मोटर्स कंपनी जोमाने तयारीला लागली आहे. हिंदुस्तान मोटर्स कंपनी अ‍ॅम्बेसिडरला इलेक्िट्रक रुपात बाजारात आणण्याचा विचार करत आहे. हिंदुस्तान मोटर्स इलेक्िट्रक स्कूटर्सचे उत्पादन करण्यासाठी युरोपियन इलेक्िट्रक वाहन उत्पादक कंपनीसोबत भागीदारी करण्याची योजना आखत आहे.

भागीदारीची संपूर्ण प्रक्रिया सुमारे तीन महिन्यांत पूर्ण होईल. कंपनी सुरुवातीला इलेक्िट्रक टू-व्हीलरचे उत्पादन करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच आगामी प्रकल्पातील सहयोग ५१.४९ गुणोत्तरावर आधारित असेल. अ‍ॅम्बेसिडरचे नवीन मॉडेल हिंदुस्तान मोटर्सच्या चेन्नई उत्पादन प्लांटमध्ये तयार केले जाईल. जे सध्या एचएमएफसीआयच्या मालकीचे आहे.

हिंदुस्तान मोटर्सचा चेन्नई प्लांट मित्सुबिशी कार बनवत असे, तर उत्तरपारा प्लांट अ‍ॅम्बेसिडर कार बनवत असे. हिंदुस्तान मोटर्सच्या उत्तरपारा प्लांटमधील शेवटची अ‍ॅम्बेसिडर सप्टेंबर २०१४ मध्ये बनवण्यात आली होती. त्यावेळी निर्मात्यावर खूप कर्ज होते आणि विक्री कमी होती, म्हणून ब्रँड ग्रुप पीएसएला विकला गेला.

logo
marathi.freepressjournal.in