...तर शेतकरी हा जीडीपी वाढीचा शिल्पकार; किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी मिळाल्यास जीडीपी वाढीस चालना-राहुल गांधी यांचे मत

काँग्रेसने किमान आधारभूत किंमत देण्यासाठी कायदेशीर हमी देण्याचा संकल्प केला
...तर शेतकरी हा जीडीपी वाढीचा शिल्पकार; किमान आधारभूत किमतीची कायदेशीर 
हमी मिळाल्यास जीडीपी वाढीस चालना-राहुल गांधी यांचे मत
Published on

नवी दिल्ली : किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळाल्यास देशातील शेतकरी अर्थसंकल्पावर ओझे ठरणार नसून सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीसाठी ते प्रोत्साहक ठरेल, असे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केले. अर्थसंकल्प पाहता एमएसपीची कायदेशीर हमी देणे शक्य नसल्याचे खोटे बोलले जात असल्याचेही ते म्हणाले. जे एमएसपीबाबत संभ्रम पसरवत आहेत. ते डॉ. स्वामीनाथन आणि त्यांच्या स्वप्नांचा अपमान करत आहेत. एमएसपीच्या हमीमुळे, भारतीय शेतकरी अर्थसंकल्पावर ओझे होणार नाही, तर शेतकरी हा जीडीपी वाढीचा शिल्पकार बनेल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

एक्सवरील हिंदीतील एका पोस्टमध्ये राहुल गांधींनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने किमान आधारभूत किंमत देण्यासाठी कायदेशीर हमी देण्याचा संकल्प केला तेव्हापासून मोदींची प्रचार यंत्रणा आणि त्यांच्यासाठी अनुकूल माध्यमांनी या संबंधात खोट्याचा बडगा उगारला आहे. ते म्हणाले, सत्य हे आहे की क्रिसिलच्या मते, २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांना एमएसपी दिल्याने सरकारवर २१ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला असता, जे एकूण बजेटच्या केवळ ०.४ टक्के आहे.

logo
marathi.freepressjournal.in