लष्कराला सिगसॉयर असॉल्ट रायफल मिळणार

या ७० हजार रायफलसाठी ८०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यापूर्वी अमेरिकेकडून मिळालेल्या ७० हजार असॉल्ट रायफल भारताला मिळाल्या आहेत.
लष्कराला सिगसॉयर असॉल्ट रायफल मिळणार
PM

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या सैनिकांची मारक क्षमता वाढवण्यासाठी सिग सॉयर असॉल्ट  रायफल मिळणार आहे. दहशतवादविरोधी मोहीम व अन्य कर्तव्यावर असणाऱ्या सैनिकांना ही रायफल दिली जाईल. संरक्षण खात्याच्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या ७० हजार रायफलसाठी ८०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यापूर्वी अमेरिकेकडून मिळालेल्या ७० हजार असॉल्ट रायफल भारताला मिळाल्या आहेत. त्याचा वापर लडाख व जम्मू-काश्मीर भागात केला जात आहे. ही रायफल उच्च क्षमतेची असून ती दूरवर मारा करू शकते.

logo
marathi.freepressjournal.in