वाराणसी : ज्ञानवापी संकुलात असलेल्या ‘व्यासजी का तहखाना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तळघराच्या चाव्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. येथील जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी बुधवारी हा आदेश दिला. त्यांनी आपल्या आदेशात सांगितले की, संकुलाच्या दक्षिणेला असलेल्या व्यासजींच्या तळघराची योग्य काळजी घेण्याची गरज आहे, असे हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले, म्हणून वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना व्यासजींच्या तळघराचा रिसिव्हर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
यादव यांनी यापूर्वी म्हटले होते की, अधिकाऱ्यांनी १९९३ मध्ये तळघराला संरक्षक कडे टाकले व कुलूप लावले होते. त्याआधी तळघराचा वापर सोमनाथ व्यास या पुजाऱ्याने पूजेसाठी केला होता, यादव यांनी आपल्या याचिकेत दावा केला होता.