देशावर सर्वात मोठा सायबर हल्ला,वेबसाईट झाल्या हॅक

हल्ल्याला मलेशिया व इंडोनेशियातील हॅकर्स जबाबदार आहेत
देशावर सर्वात मोठा सायबर हल्ला,वेबसाईट झाल्या हॅक
Published on

देशात मंगळवारी सर्वात मोठा सायबर हल्ला करण्यात आला. ५०० हून अधिक वेबसाईट ‘हॅक’ करण्यात आल्या. यात महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह ७० वेबसाईटचा समावेश आहे. या हल्ल्याला मलेशिया व इंडोनेशियातील हॅकर्स जबाबदार आहेत.

महाराष्ट्र सायबर सेलचे एडीजी मधुकर पांडे म्हणाले की, आम्ही अनेक वेबसाईट पूर्ववत केल्या आहेत. तर अनेक बेवसाईट पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. अनेक खासगी विद्यापीठांच्या वेबसाईट ‘हॅक’ केल्यानंतर राज्याच्या ७० हून अधिक वेबसाईटवर हल्ला केला. त्यातील तीन सरकारी होत्या.

देशात सुरू असलेल्या सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक सायबर हॅकर्सनी एकत्र येऊन हल्ला केला. याप्रकरणी मलेशिया व इंडोनेशियाच्या हॅकर्सची नावे पुढे आली आहेत. या हॅकर्सच्या टोळ्या भारतात सक्रिय आहेत की नाही याबाबत आम्हाला माहिती मिळाली नाही.

ठाणे पोलिसांच्या सायबर सेलचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे म्हणाले की, मंगळवारी सकाळी ४ वाजता पोलिसांची वेबसाईट हॅक करण्यात आली. तंत्रज्ञांनी डेटा व बेवसाईट पूर्ववत केली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

गृह खात्याने दिले

चौकशीचे आदेश

राज्याच्या गृह विभागाने राज्याच्या सायबर सेलला सरकारी वेबसाईट हॅक झाल्याच्या प्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ठाणे पोलिसांनी त्यांच्या वेबसाईट हॅक होण्याची चौकशी सुरू केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in