असंवेदनशीलतेचा कळस; रात्रभर मृतदेहाच्या वाहनांनी उडवल्या चिंधड्या, मृतदेहाचे केवळ बोट सापडले

रात्रभर या मृतदेहाच्या वाहनांनी चिंधड्या उडवल्या. मात्र, एकही वाहन थांबले नाही. हे दृश्य पाहून पोलीसही हादरून गेले.
असंवेदनशीलतेचा कळस; रात्रभर मृतदेहाच्या वाहनांनी उडवल्या चिंधड्या, मृतदेहाचे केवळ बोट सापडले

लखनऊ : आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर असंवेदनशीलतेचा कळस दिसून आला. या एक्स्प्रेसवर एका तरुणाचा मृतदेह सापडला. रात्रभर या मृतदेहाच्या वाहनांनी चिंधड्या उडवल्या. मात्र, एकही वाहन थांबले नाही. हे दृश्य पाहून पोलीसही हादरून गेले. या मृतदेहाचे केवळ बोट सापडले आहे. फावड्याच्या मदतीने पोलिसांना या मृतदेहाचे अवशेष गोळा करावे लागले.

न्यायवैद्यक पथकाच्या मदतीने या बोटाचे ठसे घेऊन या मृतदेहाची ओळख पटवली जात आहे. हा मृतदेह एक्स्प्रेस वे वर किती वेळ पडला होता, याची माहिती नाही. मात्र, घनदाट धुक्यामुळे चालकांना तो दिसला नसावा. रात्रभर या मृतदेहावरून गाड्या जात होत्या. या एक्स्प्रेसवर वाहनांची गती १०० किमी आहे. या वेगवान वाहनांना रोखणे ही धोकादायक आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मृताची ओळख पटल्यानंतरच हे प्रकरण समजू शकेल. मृतदेहाचे अवयव तपासणीसाठी पाठवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in