Budget : 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर ; ७ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकर नाही, आणि वाचा बरंच काही...

Budget : 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर ; ७ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकर नाही, आणि वाचा बरंच काही...

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा स्थितीत अर्थसंकल्पात दिलासा

मोठी घोषणा! ७ लाखांपर्यंत उत्पन्न मर्यादा वाढवली

बॅटरीवर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कच्च्या मालाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा

६.५ हजार कोटींचे रिटर्न यावर्षी पूर्ण करण्यात आले

गरीब कैद्यांना जामीन मिळवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

मोबाईल फोन स्वस्त होणार , कस्टम ड्युटी कमी करण्यावर लक्ष

कस्टम ड्युटी दर 21 वरून 13 वर आणण्याचा प्रस्ताव

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांसाठी दिले जाईल

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जाहीर केलेली क्रेडिट रिव्हॅम्प स्कीम 1 एप्रिलपासून लागू होणार असून त्यासाठी 9,000 कोटी रुपयांची तरतूद आहे

विविध राज्यांमध्ये 33 कौशल्य विकास केंद्रे स्थापन केली जातील, ज्यात नोकरी-व्यवसाय प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नवीन व्यावसायिक गरजांनुसार युवकांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल

५० नव्या विमानतळाची उभारणी करण्यात येणार

अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला

नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी 9700 कोटींची तरतूद, या अर्थसंकल्पात ऊर्जा क्षेत्रासाठी 35000 कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निधी 66 टक्क्यांनी वाढून 79,000 कोटी रुपयांवर - अर्थमंत्री

हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार, मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना आणणार

सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅन कार्डचा वापर कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल

सर्व शहरांमध्ये ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी मॅनहोलचं रुपांतर मशीन होलमध्ये करणार

सत्ताधाऱ्यांकडून 'मोदी, मोदी'च्या घोषणा, विरोधकांकडून 'भारत जोडो'च्या घोषणा

रेल्वेसाठी २.४० लाख कोटींची तरतूद - अर्थमंत्री

भांडवली गुंतवणूक 33 टक्क्यांनी वाढून 10 लाख कोटी रुपये झाली आहे. ही रक्कम एकूण जीडीपीच्या ३.३ टक्के आहे

निवासी शाळांसाठी पुढील 3 वर्षांत 38,800 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची केंद्रीय भरती करणार

शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष, मत्स्य, पशुपालन, डेअरी, सहकार अशा मंत्रालयांची स्थापना करण्यात आली 

मत्स्य विकासासाठी ६ हजार कोटींची विशेष तरतूद करण्यात येणार 

अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून तरुणांच्या आकांक्षा, रोजगार निर्मिती आणि व्यापक आर्थिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणार -  अर्थमंत्री

शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार - निर्मला सीतारमण

भारतात देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांची वर्दळ वाढल्याने रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध 

देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प असे म्हणत निर्मला यांची भाषणाला सुरुवात 

यूपीआय, कोविन प्रणालीमुळे जगाने भारताचे महत्त्व मान्य केले - निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाषण सुरू करताच विरोधकांच्या 'भारत जोडो'च्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार

या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र आणि मुंबईसाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे

नवीन रेल्वे मार्ग, नवीन हायस्पीड ट्रेन, वंदे भारत सारख्या सेमी हायस्पीडला अधिक प्राधान्य, बुलेट ट्रेन प्रकल्पांसाठी अधिक निधी

रेल्वेवर सर्वाधिक भर दिला गेला असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वेला १.४ लाख कोटी रुपये मिळाले होते. त्यात यंदा 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे

खाजगी जेट, हेलिकॉप्टर, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, दागिने, हाय ग्लॉस पेपर, स्टील उत्पादने, चामडे आणि जीवनसत्त्वे या वस्तूंवर आयात शुल्क वाढवले जाण्याची शक्यता

गेल्या वर्षी २०२१-२२चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला, तेव्हा २०२२-२३मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, भारत परचेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी)च्या दृष्टीने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि विनिमय दराच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे.

केंद्रातील मोदी सरकार आज 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे.

या शेअर्सवर असेल विशेष लक्ष PSU Rail Cos: IRCTC, IRFC, RVNL, IRCON, RITES • Large Cap Rail Plays: BEML, Siemens, L&T • Dedicated Freight Corridor: Timken, CONCOR, Gateway Distri • Wagon Makers: Texmaco, Titagarh Wagons & Jupiter Wagons • Capex Plays: L&T, Siemens, Thermax, Triveni Engg, Timken . Capex Plays: CG Power, Elgi Equipment, Cummins, ABB, • Green Hydrogen PLI: RIL, Adani Ent, NTPC, HPCL, IOC • Renewable Energy Push: Inox Wind, Adani Green, SW Solar • Renewable Energy Push: NTPC, Tata Power, SJVN, NHPC • Defence Push: BEL, BEML, Bharat Forge, L&T • Defence Push: Astra Micro, Dynamatic Tech, Centum, Premier Explosives TViE

अवघ्या काही तासांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २०२३ सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा स्थितीत अर्थसंकल्पात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. आयकर सवलत मिळाल्यानंतर, बहुतेक लोकांना स्वस्त किंवा अधिक महाग असलेल्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे असते. अर्थात याबाबतची नेमकी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील तेव्हाच मिळणार आहे. पण असे काही संकेत आहेत, ज्यावरून अर्थसंकल्पात काय होऊ शकते याचा अंदाज बांधता येतो. अर्थसंकल्पापूर्वी विविध मंत्रालयांनी आपल्या शिफारशी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला पाठवल्या आहेत, ज्यातून आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या वस्तू महाग होतील, याचा अंदाज येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in