रुपी सहकारी बँकेचा व्यवहार २२ सप्टेंबरपासून बंद होणार

आरबीआयने १० ऑगस्ट रोजी याबाबतचा आदेश जारी केला असून सहा आठवड्यांनंतर तो लागू होईल
रुपी सहकारी बँकेचा व्यवहार २२ सप्टेंबरपासून बंद होणार

पुणेस्थित रुपी सहकारी बँक लिमिटेड येत्या २२ सप्टेंबरपासून बँकिंग व्यवसाय बंद करणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ८ ऑगस्ट रोजी आदेश जारी करून रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. आरबीआयने १० ऑगस्ट रोजी याबाबतचा आदेश जारी केला असून सहा आठवड्यांनंतर तो लागू होईल, असे म्हटले आहे.

आरबीआयच्या आदेशानुसार २२ सप्टेंबर २०२२ पासून बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद होतील. सहकार आयुक्त आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या निबंधकांनाही बँक बंद करण्याचे आदेश जारी करून त्यासाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे.

बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ५६ सह कलम ११(१) आणि कलम २२(३) (डी) च्या तरतुदींचे पालन न केल्यामुळे आरबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे, कारण बँकेकडे पुरेसे भांडवल नाही . बँकेचा व्यवसाय सुरू ठेवणे बँकेच्या ठेवीदारांच्या हिताचे नाही, असे आरबीआयचे मत आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता बँक ठेवीदारांना पूर्ण रक्कम देऊ शकणार नाही. कलम २२(३)(a), २२(३)(b), २२(३)(c), २२(३)(d) आणि २२(३)(e) च्या आवश्यकतांचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in