सण उत्सवाच्या काळात सप्टेंबरमध्ये बँकांना १३ दिवस सुट्ट्या

केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे
सण उत्सवाच्या काळात सप्टेंबरमध्ये बँकांना १३ दिवस सुट्ट्या

ऑगस्ट महिना संपाण्यास आता जेमतेम एक आठवडा उरला आहे. गणपतीचे आगमन होणार आहे. या सण उत्सवाच्या काळात सप्टेंबरमध्ये बँकांना १३ दिवस सुट्ट्या असल्यामुळे बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात १३ दिवस बँका बंद राहणार असल्या तरी देशभरात सर्वच ठिकाणी एकाच वेळी बँका बंद राहणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही सुट्ट्या प्रादेशिक आहेत. याचा अर्थ काही राज्यांमध्ये काही दिवस फक्त बँका बंद राहतील; पण इतर राज्यांमध्ये सर्व बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.

केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवारशिवाय वेगळ्या असतील. बँकांना सुट्टी असली तरी ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील.

सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे

१ सप्टेंबर : गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) – पणजीत बँका बंद, ४ सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी), ६ सप्टेंबर: कर्मपूजा – रांचीमध्ये बँका बंद, ७ सप्टेंबर: पहिला ओणम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद, ८ सप्टेंबर: थिरुओनम- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद,९ सप्टेंबर: इंद्रजात्रा-गंगटोकमध्ये बँक बंद, १० सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), श्री नरवण गुरु जयंती, ११ सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी), १८ सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी), २१ सप्टेंबर: श्री नरवणे गुरु समाधी दिन – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद, २४ सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार), २५ सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी), २६ सप्टेंबर: नवरात्री स्थापना / लॅनिंगथौ सन्माही चौरेन हौबा – इम्फाळ आणि जयपूरमध्ये बँका बंद.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in