Parliament Special Session: केंद्र सरकार बोलावणार संसदेचं विशेष अधिवेशन ; 10 पेक्षा जास्त महत्वपूर्ण विधेयकं मांडली जाणार

१८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या काळात संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.
Parliament Special Session: केंद्र सरकार बोलावणार संसदेचं विशेष अधिवेशन ; 10 पेक्षा जास्त महत्वपूर्ण विधेयकं मांडली जाणार

केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या काळात संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यात १० पेक्षा जास्त विधेयकं मांडली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या अधिवेशनात मांडली जाणारी विधेयके नेमकी कोणती आहेत याबाबातची माहिती थोड्या वेळात देण्यात येणार आहेत.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी (३१ ऑगस्ट) रोजी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलयं की. संसदेचं विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये ५ बैठका होणार आहेत. या अधिवेशनात १० पेक्षा जास्त विधेयकं मांडळी जाणार असून यामुळेच हे विशेष अधिवेशन बोलावलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

२० जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत चाललेल्या संसदेच्या पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचारावर दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात उत्तर द्यावं यासाठी विरोधी पक्षांनी मिळून सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in