
खगोल पर्यटनाला चालना देण्यासाठी देशातील पहिले खगोल निरीक्षण केंद्र लडाखमध्ये उभारले जाणार आहे. त्याला ‘डार्क स्काय रिझर्व्ह’ असे नाव देण्यात आले आहे. हा प्रकल्प पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे लडाखचे नायब राज्यपाल आर.के. माथूर यांच्या भेटीनंतर ही माहिती दिली.