एपी फायबरनेट घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू मुख्य आरोपी; सीआयडीकडून आरोपपत्र दाखल

एपी फायबरनेट घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू मुख्य आरोपी; सीआयडीकडून आरोपपत्र दाखल

गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या एसीबी न्यायालयात एपी फायबरनेट घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले आहे.
Published on

अमरावती : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तुलूग देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ११४ कोटी रुपयांच्या कथित एपी फायबरनेट घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीआयडीने त्यांना मुख्य आरोपी केले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या एसीबी न्यायालयात एपी फायबरनेट घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात चंद्राबाबू यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर असताना चंद्राबाबू नायडू यांचे नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आल्यामुळे राज्यातील राजकारणाला आणि त्यांच्या तुलूग देसम पार्टीसाठी हा धक्का असल्याचे बोलले जात आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासह हैदराबादमधील नेट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. हरी कृष्णा प्रसाद यांचेदेखील नाव सीबीआयने आपल्या आरोपपत्रात दाखल केले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार वस्तूच्या किमतींचे बाजारात सर्वेक्षण झालेले नव्हते.

logo
marathi.freepressjournal.in