पाकिस्तानमध्ये इंधन दर वाढीचे संकट गंभीर होणार

पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीचा अंदाज यावरून लावता येतो की, १२ तास वीज कपात केली जात आहे
पाकिस्तानमध्ये इंधन दर वाढीचे संकट गंभीर होणार

श्रीलंकेला इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असताना, पाकिस्तानमध्येही अशीच स्थिती दिसून येत आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीचा अंदाज यावरून लावता येतो की, १२ तास वीज कपात केली जात आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. याचा थेट परिणाम देशातील सर्वसामान्य जनतेवर होत असून, प्रत्यक्षात आधीच वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. डिझेलच्या दरात ५९.६१ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरात २४.०३ रुपयांची वाढ झाली आहे.

पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसाद मलिक यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत राहण्यासाठी इम्रान खान सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले आहे. मलिक म्हणाले की, इम्रान सरकारने पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. सबसिडी देऊन त्यांनी जाणीवपूर्वक पेट्रोलचे दर कमी केले होते, त्यामुळे आमचे सरकार आणि जनता त्रस्त आहे. इंधन दरवाढीवरून त्यांनी माजी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in