देशाची विकास यात्रा सुरुच राहणार; पंतप्रधान : संसदेत गदारोळ करणाऱ्या खासदारांवर टीका

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीचे विद्यमान लोकसभेचे अंतिम अधिवेशन बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू झाले. त्यानंतर पत्रकारांना संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची विकास यात्रा यापुढेही अशीच सुरू राहणार, असा विश्वास व्यक्त केला.
देशाची विकास यात्रा सुरुच राहणार; पंतप्रधान : संसदेत गदारोळ करणाऱ्या खासदारांवर टीका

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीचे विद्यमान लोकसभेचे अंतिम अधिवेशन बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू झाले. त्यानंतर पत्रकारांना संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची विकास यात्रा यापुढेही अशीच सुरू राहणार, असा विश्वास व्यक्त केला. तसेच देश आता विकासाची नवी शिखरे पार करीत असून सर्वसमावेशक व सर्वांगिण विकास जनतेच्या आशीर्वादाने यापुढेही असाच सुरू राहील, असाही विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पत्रकारांशी संवाद साधण्याची परंपरा आहे. त्या परंपरेला अनुसरुन पंतप्रधान बोलत होते. पत्रकारांचे राम राम म्हणून त्यांनी स्वागत करुन नंतर बोलणे सुरु केले.

निवडणुकीपूर्वी पूर्ण अर्थसंकल्प न सादर करण्याची आपल्या देशात परंपरा असून आम्ही तिचे पालन करीत आहोत. निवडणुकीनंतर सरकार स्थापन होताच आम्ही पूर्ण अर्थसंकल्प आपल्यासमोर सादर करु. दरम्यान निर्मला सितारामन गुरुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत, असे म्हणत पंतप्रधानांनी आपण पुन्हा सत्तेत येणार असल्याच्या विश्वासाचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी यावेळी विरोधी पक्षांच्या खासदारांना आपल्या टिकेचे लक्ष्य केले. निवडणूकी पूर्वीच्या अंतिम अधिवेशनात खासदार येथे उपस्थित होणार आहेत. त्यापैकी संसदेचे कामकाज वारंवार खंडित करण्याची व गदारोळ घालण्याची सवय लागलेल्या खासदारांनी आत्मपरिक्षण करावे. या खासदारांनी आपापाल्या मतदार संघात जाउन जरी विचारले तर त्यांना कळेल की असा गोंधळ घालणाऱ्यांना कोणीही लक्षात ठेवत नाही. पण जे खासदार आपल्या कल्पकतेने मग ती टिका करण्यासाठीची का असेना आपले विचार मांडले आहेत असे खासदार बहुतांशांच्या लक्षात राहतात. त्यांचे शब्दांची इतिहास नोंद घेतो. त्यांचे विचार इतिहास ठरतात असे मोदी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in