भारतीय शेअर बाजाराची दिशा ठरणार, विदेशी गुंतवणूक संस्थांची भूमिका पाहणे आवश्यक

रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने विक्रीचा मारा वाढला होता.
भारतीय शेअर बाजाराची दिशा ठरणार, विदेशी गुंतवणूक संस्थांची भूमिका पाहणे आवश्यक

जागतिक कल, तिमाही निकाल, आयआयपी, महागाईदर आदींवर या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराची दिशा ठरणार आहे. विदेशी गुंतवणूक संस्थांची नेमकी भूमिका काय राहील, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

याशिवाय, रुपया - डॉलरची काय स्थिती राहील, जागतिक बाजारातील ब्रेंट कअऊह तेलाचे दर या मुद्यांवरही शेअर बाजाराची भावना अवलंबून असणार आहे. गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स १,५७३.९१ अंक किंवा २.९७ टक्के तर निफ्टी ४६८.५५ अंक किंवा २.९७ टक्के वधारला.

विदेशी संस्थांनी जुलैमध्ये

काढले चार हजार कोटी

विदेशी गुंतवणूक संस्थांनी जुलै महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री करत चार हजार कोटी रुपये काढले आहेत. रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने विक्रीचा मारा वाढला होता. तथापि, गेल्या काही आठवड्यापासून विदेशी गुंतवणूक संस्थांच्या विक्रीचा वेग मंदावला आहे.

१ ते ८ जुलैमध्ये विदेशी गुंतवणूक संस्थांनी ४,०९६ कोटी काढले. मात्र, अनेक आठवड्यानंतर ६ जुलै रोजी विदेशी संस्थांनी २,१०० कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. जूनमध्ये विदेशी संस्थांनी ५०,२०३ कोटी रुपये काढले.

मार्च २०२० पासून पैसे काढून घेण्याचा त्यांचा सपाटा सुरु असून त्यांनी ६१,९७३ कोटी रुपये काढले आहे. यावर्षी आतापर्यंत २.२१ लाख कोटी त्यांनी काढले आहेत. तत्पूर्वी, २००८ मध्ये त्यांनी ५२,९८७ कोटी रुपये काढले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in