जागतिक बाजार,रुपयाचा कल आणि विदेशी गुंतवणूकीवर शेअर बाजाराची दिशा ठरणार

विदेशी गुंतवणूक संस्थांकडून भारतीय शेअर बाजारातील विक्रीचा मारा सुरुच आहे.
जागतिक बाजार,रुपयाचा कल आणि विदेशी गुंतवणूकीवर शेअर बाजाराची दिशा ठरणार

खासगी कंपन्यांचे वित्तीय निकाल, जागतिक बाजार, रुपयाचा कल आणि विदेशी गुंतवणूक संस्थांची भूमिका काय असेल ? यावर पुढील आठवड्यातील शेअर बाजाराची दिशा ठरणार आहे, असे विश्लेषकांनी सांगितले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील ब्रेंट क्रूडचे दर काय असतील यावरही बाजाराचा दबाव असणार आहे.

एचडीएफसी बँकेने शनिवारी जाहीर केलेल्या निकालावर बाजारात सोमवारी प्रतिक्रिया उमटेल तर तर अबुंजा सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर लि., इंडस‌्इंड बँक आणि विप्रो आदी प्रमुख कंपन्यांचे तिमाही निकाल या आठवड्यात लागणार असल्याने त्यावर बाजाराची दिशा ठरेल, असे संतोष मीना, हेड ऑफ रिसर्च, स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लि. यांनी सांगितले.

विदेशी संस्थांकडून विक्रीचा मारा सुरुच

विदेशी गुंतवणूक संस्थांकडून भारतीय शेअर बाजारातील विक्रीचा मारा सुरुच आहे. त्यामुळे जुलैमध्ये आतापर्यंत त्यांनी ७,४०० कोटी रुपये बाजारातून काढले. रुपयाच्या तुलनेत डॉलरची मजबुती आणि अमेरिकेत मंदी येण्याच्या भीतीने शेअर बाजारातून पैसे काढून घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे जूनमध्ये विदेशी संस्थांनी शेअर बाजारातून तब्बल ५०,२०३ कोटी रुपये काढून घेतले. विदेशी संस्थांनी १ ते १५ जुलै या कालावधीत भारतीय शेअर बाजारातून ७,४३२ कोटी रुपये काढून घेतल्याचे शेअर बाजाराच्या आकडेवारीवरुन दिसते. तथापि, विदेशी संस्थांचा गेल्या आठवड्यात खरेदीचा कल दिसून आला असला तरी त्यांची भूमिका सावध राहण्याचे दिसते, असे कोटक सिक्युरिटीजचे हेड, इक्विटी रिसर्च (रिटेल) श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

तसेच भू-राजकीय तणाव, वाढती महागाई, मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आदी मुद्द्यांवर विदेशी गुंतवणूक संस्था दोलायमान राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in