देशातील दोन कोटी महिलांना 'लखपती' बनवण्याचे स्वप्न; पंतप्रधान मोदी यांची मनिषा

पंतप्रधान मोदींनी रुबीनाच्या आत्मविश्वासाबद्दलही कौतुक केले आणि ते म्हणाले की "केवळ महिलांचा हा आत्मविश्वास देशाला 'आत्मनिर्भर' बनवेल."
देशातील दोन कोटी महिलांना 'लखपती' बनवण्याचे स्वप्न; पंतप्रधान मोदी यांची मनिषा
PM
Published on

भोपाळ : मला देशातील बचत गटांशी संबंधित दोन कोटी महिलांना  'लखपती' महिला बनवण्याची इच्छा आहे, अशी मनिषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. 'विकसित भारत संकल्प यात्रे'चा एक भाग म्हणून मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यक्रमांच्या लाभार्थींशी आभासी संवाद त्यांनी साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते तेथे असलेल्या रुबिना खान यांच्याशी संवाद करत होते. त्यावेळी त्यांनी तिला विचारले की, ती आपल्याला या प्रयत्नांमध्ये मदत करील का, तिच्या गटातील किती महिलांना तिला लखपती बनवायचे आहे असे विचारले असता तिने उत्तर दिले की, "मला देशातील प्रत्येक महिलेला लखपती बनवायचे आहे.

जेव्हा पंतप्रधान म्हणाले, "हे रुबिनाचे उत्तर राजकीय प्रत्युत्तर आहे."त्यानंतर मोदींनी यावेळी उपस्थित महिलांना लखपती व्हायचे असल्यास हात वर करण्यास सांगितले, ज्याला सर्वांनी होकारार्थी उत्तर दिले.

 रुबिनाशी झालेल्या संवादातून  तिने पंतप्रधानांना सांगितले की, कोविड-१९ कालावधीत सुरुवातीच्या प्रतिकारानंतर, तिच्या गटातील महिलांनी घातक विषाणूचा सामना करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि किट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रत्येकाने त्या क्रियाकलापातून ६० ते ७० हजार रुपये कमावले. ज्याने मोदीही थक्क झाले. अशा कामातून त्यांनी केवळ देशाची सेवाच केली नाही, तर कठीण काळातही कमाईचा मार्ग शोधला, असेही रुबिनाने सांगितले. पंतप्रधान मोदींनी रुबीनाच्या आत्मविश्वासाबद्दलही कौतुक केले आणि ते म्हणाले की "केवळ महिलांचा हा आत्मविश्वास देशाला 'आत्मनिर्भर'  बनवेल."

logo
marathi.freepressjournal.in