अरुणाचल, सिक्कीमच्या मतमोजणी तारखेत बदल

आयोगाने या राज्यांच्या मतमोजणीची तारीख २ जून २०२४ अशी बदलली आहे. या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी यापूर्वी ४ जूनला होणार होती.
अरुणाचल, सिक्कीमच्या मतमोजणी तारखेत बदल

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश, सिक्कीम येथील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेत २४ तासांत बदल केला आहे. आयोगाने या राज्यांच्या मतमोजणीची तारीख २ जून २०२४ अशी बदलली आहे. या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी यापूर्वी ४ जूनला होणार होती.

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ २ जूनला संपणार आहे. यामुळे मतमोजणी २ जूनपर्यंत पूर्ण होऊन निकाल लागणे गरजेचे आहे. याच कारणामुळे निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांत निवडणुकीच्या निकालाच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in