लोकसभा निवडणूक पहिला टप्पा नामनिर्देशन प्रक्रिया सुरू

राष्ट्रपतींच्यावतीने निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २७ मार्च ही आहे. तथापि, उत्सवामुळे बिहारमधील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २८ मार्च ही आहे.
लोकसभा निवडणूक पहिला टप्पा नामनिर्देशन प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिलपासून सुरू होत असून त्यासाठी बुधवारी अधिसूचना जारी करण्यात आली. देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ मतदारसंघातील नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रपतींच्यावतीने निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २७ मार्च ही आहे. तथापि, उत्सवामुळे बिहारमधील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २८ मार्च ही आहे. बिहारमधील ४० जागांपैकी पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी २८ मार्च रोजी केली जाणार आहे, तर बिहारमध्ये ही मुदत ३० मार्च अशी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ३० मार्च असून बिहारमध्ये ही मुदत २ एप्रिल अशी आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार असून त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी येथे मतदान होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in