आम्हाला नजरकैदेत ठेवण्यासाठी सरकारला निमित्त हवे आहे -ओमर अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीरच्या लोकांच्या बाजूने निर्णय होईल अशी आशा आणि प्रार्थना करू शकतो. असे सांगून अब्दुल्ला यांनी कुलगाम जिल्ह्यात पत्रकारांना सांगितले
आम्हाला नजरकैदेत ठेवण्यासाठी सरकारला निमित्त हवे आहे -ओमर अब्दुल्ला

श्रीनगर : कलम ३७० याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी काश्मीरमधील मुख्य प्रवाहातील राजकारण्यांना नजरकैदेत ठेवले जाऊ शकते. सरकारला त्यासाठी फक्त ‘निमित्त’ हवे आहे, अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

जम्मू आणि काश्मीरच्या लोकांच्या बाजूने निर्णय होईल अशी आशा आणि प्रार्थना करू शकतो. असे सांगून अब्दुल्ला यांनी कुलगाम जिल्ह्यात पत्रकारांना सांगितले की, आम्हाला नजरकैदेत ठेवण्यासाठी त्यांना एक निमित्त हवे आहे आणि त्यांच्याकडे एक सबब आहे. आम्हाला काय निर्णय होईल याची माहिती नाही, तसे तेही आहेत. जर त्यांना माहिती असेल तर चौकशी झाली पाहिजे, असे अब्दुल्ला यांनी सांगितले.

या संबंधात सोमवारी निकाल लागणार असून त्याबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारले होते. त्यावर ते म्हणाले की, काय होणार आहे हे कोण अधिकाराने सांगेल? माझ्याकडे अशी कोणतीही यंत्रणा किंवा मार्ग नाही ज्याद्वारे मी आज समजू शकेन की त्या पाच माननीय न्यायाधीशांच्या हृदयात काय आहे किंवा त्यांनी निकालपत्रात काय लिहिले आहे. ते कसे सांगणार, निर्णय आमच्या बाजूने लागेल अशी मी फक्त आशा आणि प्रार्थना करू शकतो. पण, यश आमचंच असेल असा दावा मी करू शकत नाही किंवा इतरही कोणी करू शकत नाही. आम्ही निकालाची वाट पाहत आहोत, तो येऊ द्या, मग बोलू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in