गेल्या महिन्याभरापासून टोमॅटोच्या वाढलेल्या दरांमुळे सर्रजन हैराण झाले आहेत. यामुळे अनेकाचं बजेट देखील बिघडलं आहे. आता स्वातंत्र्य दिनी सरकारने स्वस्त दरात टोमॅटो विकण्याची घोषणा केली आहे. टोमॅटो सध्या बाजारात ७० रुपये किलोने विकले जाणार आहेत. देशभरात टोमॅटोचे वाढलेले दर पाहता, सरकारने १५ ऑगस्टपासून दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन सहासंघ (NAFED) यांना १५ ऑगस्टपासून ५० रु किलो दराने टोमॅटोची विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. १४ जुलै पासून दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोची किरकोळ विक्री सुरु झाली आहे. एनसीसीएफ आणि नाफेडकडून १३ ऑगस्टपर्यंत १५ लाख किलो टोमॅटोची खरेदी झाली आहे.
दिल्ली-एनसीआर, राजस्थान(जयपूर, कोटा), उत्तर प्रदेश (लखनौ, कानपूर,वाराणसी, प्रयागराज) आणि बिहार(पाटणा, मुझफ्फरपूर, आरा आणि बक्सर) या ठिकाणी हे टोमॅटो विकले गेले. हे टोमॅटो सुवातीला ९० रुपये प्रतिकिलोने विकले गेले होते. यानंतर १६ जुलैनंतर त्यांची किंमत ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी करण्यात आली. मात्र, आता २० जुलैपासून ७० रुपये किलोने ही खरेदी सुरु झाली. देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किंमती नियंत्रित करण्यासाठी अनुदानित दराने टोमॅटोची विक्री सुरु केली गेली.