ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टात गुरुवारी सुनावणी होणार

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टात गुरुवारी सुनावणी होणार

ज्ञानवापी मशीद परिसरात ज्या ठिकाणी शिवलिंग असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या जागेचे संरक्षण करण्यात यावे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव नमाज पठण करण्यात कोणतीही बाधा येऊ नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले. आता ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टात गुरुवारी (१९ मे रोजी) सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नरसिंह यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ज्या ठिकाणी शिवलिंग मिळाले त्याचे संरक्षण करण्यात यावे आणि नमाज पठणावर कोणता परिणाम होऊ नये, असे आदेश वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर वाद आणखी चिघळला असून मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे, तर मुस्लीम पक्षाने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाला स्थगिती देण्याबाबत मुस्लिम पक्षाच्यावतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. अंजुमन इंट्राजेनिया समितीने सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुचवले की, पुढील कार्यवाही करण्यापूर्वी जिल्हा न्यायालयाला मुस्लीम बाजूच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in