
नवी दिल्ली : मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका एप्रिल महिन्यात ज्या पीठाने फेटाळली होती त्याच पीठासमोर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) पडताळणीचे धोरण ठरविण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. ईव्हीएमबाबतची याचिका सुनावणीसाठी आली तेव्हा न्या. विक्रम नाथ आणि न्या. पी. बी. वैराळे यांच्या पीठाने सवाल केला की, याबाबतची सुनावणी एप्रिल महिन्यात निकाल देणाऱ्या पीठासमोर का होणार नाही? त्यानंतर ज्येष्ठ वकील शंकरनारायणन यांनी एप्रिल महिन्यात ज्या पीठाने मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची याचिका फेटाळली होती त्याची माहिती दिली. त्यानंतर, म्हणूनच आपण म्हणत आहोत की, याचिका त्याच पीठासमोर सुनावणीसाठी गेली पाहिजे, असे न्या. नाथ म्हणाले.