हेमंत सोरेन सरकारने विश्वास ठराव जिंकला

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारने सोमवारी राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला, त्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.
हेमंत सोरेन सरकारने विश्वास ठराव जिंकला
Published on

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारने सोमवारी राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला, त्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.

नामनियुक्त सदस्य ग्लेन जोसेफ गॉलस्टॉन यांच्यासह ४५ सदस्यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले. शिरगणती सुरू होताच भाजप आणि एएसजेयूच्या आमदारांनी सभात्याग केला. भाजपच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांचे २४ सदस्य आहेत तर एएसजेयूचे तीन सदस्य आहेत.

सत्तारूढ आघाडीतील एकता आणि सामर्थ्य प्रत्येकाने पाहिले आहे. आपण अध्यक्षांचे आणि आघाडीतील सर्व आमदारांचे आभार मानतो, आपल्याला पुन्हा एकदा सभागृहात पाहून भाजपच्या सदस्यांचे वर्तन कसे होते ते सगळ्यांना दिसले. भाजपकडे राज्यासाठी कोणताही कर्यक्रम नाही, विधानसभेच्या आगामी निवडणुकीत 'जेएमएम'च्या नेतृत्वाखालील आघाडीकडून भाजपला जोरदार विरोध केला जाईल, असे हेमंत सोरेन म्हणले.

logo
marathi.freepressjournal.in