नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका एकापाठोपाठ एक दाखल केल्या जात असल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.
या प्रकारची सातत्याने मागणी केली जात आहे ते योग्य नाही. कारण हा बॉण्डपटातील अनुषंगाने येणारा भाग नाही, असे उच्च न्यायालयाने खडसावले. न्यायालयाला राजकीय गदारोळात गुंतविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुख्य न्यायाधीश मनमोहन यांनी याचिकाकर्ते व ‘आप’चे माजी आमदार संदीपकुमार यांना खडसावले आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला जाईल, असा इशारा दिला.