राजकीय पक्षांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव; काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची टीका

काँग्रेसला शुक्रवारी १८२३.०८ कोटी रुपये कर भरण्याची नोटीस आली आहे, तर भाजप सरकारने काँग्रेसला १३५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. दुसरीकडे भाजपला ८२५० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे मिळाले आहेत.
राजकीय पक्षांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव; काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची टीका
Published on

पुदुकोट्टई : प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला १३५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा प्रकार म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना इशारा आहे. तसेच देशातील राजकीय पक्ष उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली.

काँग्रेसला शुक्रवारी १८२३.०८ कोटी रुपये कर भरण्याची नोटीस आली आहे, तर भाजप सरकारने काँग्रेसला १३५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. दुसरीकडे भाजपला ८२५० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे मिळाले आहेत. मात्र, काँग्रेसला आलेली नोटीस म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना इशारा आहे. त्यांना हे पक्ष नष्ट करायचे आहेत. भाजपचा अजेंडा आहे, ‘एक देश-एक निवडणूक’. मात्र, भाजपला ‘एक देश-एक पक्ष’ असे करायचे आहे. हा सर्वांसाठी धोक्याचा इशारा आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in