आपही इंडिया आघाडीतून बाहेर? पंजाबमधील सर्व जागा लढणार -केजरीवाल

आपही इंडिया आघाडीतून बाहेर? पंजाबमधील सर्व जागा लढणार -केजरीवाल

इंडिया आघाडी बनवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीला रामराम करत भाजपशी घरोबा केला आहे.

नवी दिल्ली : इंडिया आघाडीतून राष्ट्रीय लोक दल बाहेर पडल्यानंतर शनिवारी दुसऱ्याच दिवशी आम आदमी पार्टी आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील सर्व लोकसभा जागा आप लढवणार असून राज्यातील १३ उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले.

अरविंद केजरीवाल म्हणाले, “मी आज पुन्हा एकदा सर्व जनतेसमोर हात जोडून आशीर्वाद मागतो. दोन महिन्यांनी होणारी लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार आहोत. पंजाबमधील सर्व १३ जागा आणि चंदिगडमधील एका जागेवर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करणार आहोत. येत्या १० ते १५ दिवसांत आम्ही आमच्या सर्व १४ उमेदवारांची यादी जाहीर करू. मी सर्व जनतेला विनंती करेन की, ज्याप्रकारे तुम्ही दोन वर्षांपूर्वी मला आणि आमच्या आम आदमी पार्टीला आशीर्वाद दिला, तसाच आशीर्वाद यावेळी पुन्हा एकदा द्या.”

इंडिया आघाडी बनवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीला रामराम करत भाजपशी घरोबा केला आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीदेखील पश्चिम बंगालमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे आता केजरीवालही आघाडीतून बाहेर पडले तर आघाडीची उत्तर भारतातील ताकद कमी होऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in