भारतीय हवाईदल आत्मनिर्भर होणार

११४ पैकी ९६ विमाने भारतात बनवली जाणार.केवळ १८ विमाने परदेशी कंपन्यांकडून बनवून घेतली जाईल
भारतीय हवाईदल आत्मनिर्भर होणार
Published on

भारतीय हवाईदलाला ११४ लढाऊ विमाने खरेदी करायची आहेत. ही विमाने खरेदी करताना ती भारतातच बनवली जातील, याकडे सरकारने कटाक्षाने लक्ष पुरवले आहे. ११४ पैकी ९६ विमाने भारतात बनवली जाणार आहेत. तर केवळ १८ विमाने परदेशी कंपन्यांकडून बनवून घेतली जाईल.

भारतीय हवाईदलाला ‘मल्टिरोल फायर एअरक्राफ्ट’ खरेदी करायची आहेत. ती खरेदी करताना जागतिक कंपन्यांकडून घेतली जातील; मात्र त्याचे उत्पादन भारतात करावे लागणार आहे. या खरेदीसाठी बोईंग, लॉकहीड मार्टिन, साब, मिग, डसॉल्ट, इरकुत कॉर्पोरेशन सहभागी होऊ शकतात.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, भारतीय हवाईदलाने नुकतीच परदेशी विक्रेत्या कंपन्यांसोबत बैठक घेतली. यात १८ विमाने थेट आयात केली जातील. तर ३६ लढाऊ विमाने देशात बनवली जातील. या विमानांची किंमत ही परदेशी व भारतीय चलनात दिली जाईल. तर ६० विमाने बनवण्याची जबाबदारी ही भारतीय भागीदाराची असेल. ज्यासाठी भारत सरकार केवळ भारतीय चलनात पैसे देऊ करेल. या प्रकल्पामुळे या कामात सहभागी होणाऱ्या वेंडर्सना ‘मेक इन इंडिया’ सामग्री मिळण्यास मदत मिळेल.

पाकिस्तान व चीनमुळे भारतीय हवाईदलाला ११४ लढाऊ विमानांवर अवलंबून राहावे लागते. २०२०मध्ये लडाख संकटाच्या काळात ३६ राफेल विमानांनी चीनवर दबाव आणला होता; मात्र ही संख्या पुरेशी नाही.

logo
marathi.freepressjournal.in