आता आयपीएल दिसणार टीव्ही आणि डिजीटल चॅनेल्सवर

एकूण ४१० सामन्यांसाठी हे माध्यम हक्क विकण्यात आल्याची माहिती मिळत आहे
 आता आयपीएल दिसणार टीव्ही आणि डिजीटल चॅनेल्सवर

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) माध्यम हक्कांबाबत रविवारपासून लिलाव सुरू झाल्यानंतर सोमवारी लिलावाच्या दुसऱ्या दिवशी पुढील पाच वर्षांसाठी जगातील सर्वात मोठ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे टीव्ही आणि डिजिटल हक्क विकले गेले. २०२३ ते २०२७ या वर्षांसाठी हे हक्क दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी ४४,०७५ हजार कोटी रुपयांना विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ आयपीएल आता टीव्हीवरील वेगळ्या चॅनेल्सवर आणि अॅप व वेबसाइटवर दिसणार आहे. एकूण ४१० सामन्यांसाठी हे माध्यम हक्क विकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

आयपीएलचे टेलिव्हिजन हक्क सोनीला आणि डिजिटल हक्क वायाकॉमकडे (रिलायन्स) गेले आहेत. सूत्रांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांसाठी टीव्ही हक्क प्रति सामना ५७.५० कोटी रुपये आणि डिजिटल हक्क ४८ कोटी रुपये प्रति सामना या दराने विकले गेले आहेत. सोनी नेटवर्कने आयपीएल टीव्हीचे हक्क विकत घेतले.

दरम्यान, पाच वर्षांसाठी टीव्ही आणि डिजिटल हक्काच्या लिलावातून बीसीसीआय बक्कळ पैसा कमावण्याची शक्यता यापूर्वी वर्तविण्यात आली होती. या प्रक्षेपण हक्काच्या या लिलावामुळे आयपीएल ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत लीग होणार आहे. बीसीसीआयने या लिलाव प्रक्रियेतून आयपीएलला जवळपास ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

बीसीसीआयकडून अ, ब, क आणि ड असे चार पॅकेज तयार करण्यात आले होते. टीव्ही, डिजिटल, शनिवार व रविवारच्या लढती तसेच प्ले ऑफ आणि परदेशातील हक्क असे चार वेगवेगळे पॅकेज करण्यात आले. प्रत्येकाने या चारही पॅकेजसाठी वेगवेगळ्या बोली लावल्या. अ पॅकेजसाठी बोली लावणाऱ्यांची मूळ संपत्ती एक हजार कोटी असायला हवी, अशी अट होती. तसेच इतर पॅकेजसाठी मूळ संपत्ती ही ५०० कोटी आवश्यक होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in