ताजमहल ज्या जमिनीवर बांधण्यात आलेय ती जमीन जयपूरच्या शाही कुटुंबाच्या मालकीची ;दिया कुमारी

ताजमहल ज्या जमिनीवर बांधण्यात आलेय ती जमीन जयपूरच्या शाही कुटुंबाच्या मालकीची ;दिया कुमारी

भाजपच्या खासदार आणि जयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी यांनी ताजमहल ज्या जमिनीवर बांधण्यात आलेय ती जमीन जयपूरच्या शाही कुटुंबाच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. दिया कुमारी यांनी या जमिनीचा मालकी हक्क सांगणारी कागदपत्रेही आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून ताजमहलमधील २२ बंद खोल्या उघडून त्यामध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत का यासंदर्भात तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेच्या समर्थनार्थ बोलताना भाजपच्या नेत्या असणाऱ्या दिया कुमारी यांनी, “हे स्मारक उभारण्याआधी या ठिकाणी काय होते याचा तपास केला पाहिजे. या ठिकाणी मकबरा उभारण्याआधी काय होते हे जाणून घेण्याचा हक्क लोकांना आहे,” असे म्हटले आहे.

“ताजमहल बांधण्यात आलेल्या जमिनीची मालकी जयपूर घराण्याकडे असल्याचे पुरावे आहेत. गरज पडल्यास आपण हे पुरावे सादर करू,” असे त्यांनी सांगितले. मुघल सम्राट शहाजहाँनने आमच्या कुटुंबाच्या ताब्यातील जमीन घेतल्याचा दावाही दिया कुमारी यांनी केला आहे.

“या जागेच्या मोबदल्यात भरपाई देण्यात आली होती का, ती नेमकी किती होती, ती स्वीकारण्यात आली की नाही, याबद्दल मी काही सांगू शकत नाही. कारण माझा त्याबद्दलचा अभ्यास नाही. हे आमच्या पोथीखान्यामधील कागदपत्रांमध्ये नमूद आहे,” असे त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in