
कर्मचारी पेन्शन योजनेतून (ईपीएस) उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सोमवारी, २६ जून २०२३ होती. ही मुदत आता वाढवण्यात आली असून ११ जुलैपर्यंत करण्यात आली आहे. अर्जदारांना ‘ईपीएफओे’ पोर्टलद्वारे अर्ज सादर करण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची मूळ मुदत ३ मार्च होती, जी दोनदा वाढवण्यात आली. आधी ३ मे आणि नंतर ती २६ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ती पुन्हा वाढवण्यात आली आहे.