जून महिन्यात घाऊक महागाईचा सर्वात नीचांकी दर

किरकोळ महागाई दरात किंचित घसरण होऊन जूनमध्ये ७.०१ टक्के दर राहिला आहे.
जून महिन्यात घाऊक महागाईचा सर्वात नीचांकी दर

भारतातील घाऊक महागाईचा दर जून महिन्यातही १५ टक्क्यांहून अधिक राहिला आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार जूनमध्ये घाऊक महागाईचा दर १५.१८ टक्के राहिला आहे. तथापि, गेल्या तीन महिन्यांमधील हा दर नीचांकी ठरला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ)ने जाहीर केलेल्या आकडेवारीत हे दिसून आले.

दरम्यान, मंगळवारी जाहीर झालेल्या किरकोळ महागाई दरात किंचित घसरण होऊन जूनमध्ये ७.०१ टक्के दर राहिला आहे. मे महिन्यात हा दर ७.०३ टक्के होता. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात घाऊक महागाई दरात थोडीशी घट झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात घाऊक महागाई दर १५.८८ टक्के होता. तर मे मध्ये अन्नधान्य दर १२.३४ टक्के होता.

जूनमध्ये अन्नधान्याचा दर १४.३९ टक्के राहिला आहे. भाज्या, फळे आणि बटाटे यांच्या दरात मागील वर्षी जूनच्या तुलनेत काही प्रमाणात घसरण झाल्याने घाऊक महागाई दरात किंचित घट झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महागाई वाढत चालली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून २०२२ मध्ये खनिज तेल, अन्नपदार्थ, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, रसायने, रासायनिक उत्पादने आणि अन्नाशी संबंधित उत्पादनांमध्ये वाढ सुरूच आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या जूनच्या तुलनेत यंदा जूनमध्ये महागाईपासून दिलासा मिळाला नाही.

भाज्यांचे भाव ५६.७५ टक्के वाढले तर बटाटे आणि फळांच्या दरात अनुक्रमे ३९.३८ टक्के आणि २०.३३ टक्के वाढ झाली. इंधन आणि वीज विभागात महागाई ४०.३९ टक्के तर निर्मिती क्षेत्रातील उत्पादनांचा आणि तेल बियांच्या दरात अनुक्रमे ९.१९ टक्के आणि २.७४ टक्के वाढ झाली. जूनमध्ये क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाई दरात ७७.२९ टक्के वाढ झाली.

इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या की, खनिजे आणि बेसिक धातू यांच्या उत्पादनात मासिक आधारावर जून २०२२ मध्ये जागतिक मंदीच्या भीतीने घट झाल्याने त्यांच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

आमचा अंदाज आहे की, जुलै २०२२ मध्ये घाऊक महागाई दरात घसरण होऊन ते १३ टक्क्यांपर्यंत घटेल. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड तेलाच्या दरात आणि देशांतर्गत बाजारात अन्नधान्याच्या किंमतीत घट होईल. त्यामुळे जुलैमध्ये घाऊक महागाईत घट होईल, असेही नायर म्हणाल्या.

तथापि, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाच्या पलीकडे अद्याप किरकोळ महागाई दर आहे. त्यामुळे महागाईला पायबंद घालण्यासाठी आगामी द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होते का हे लवकरच दिसून येईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in