कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना धमकी देणारा अखेर अटकेत

आरोपी कतरिना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करत होता आणि तिच्या पोस्टवर अश्लील कमेंट लिहीत होता
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना धमकी देणारा अखेर अटकेत
ANI

बॉलीवूड अभिनेता आणि अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येत होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी यापूर्वी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली होती. एएनआयच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने आरोपीची ओळख पटवली होती. आरोपी कतरिना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करत होता आणि तिच्या पोस्टवर अश्लील कमेंट लिहीत होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (२) (धमकी) आणि ३५४ (डी) (महिलेचा अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयटी अॅक्ट 67 (अश्लील फोटो, व्हिडिओ आणि कमेंट पोस्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विकी-कतरिना मालदीवच्या सुट्टीवर गेले होते

अलीकडेच कतरिना कैफ आणि विकी कौशल मालदीवच्या सुट्टीवर गेले होते, जिथे दोघांनी कतरिनाचा वाढदिवस साजरा केला. त्याचे फोटोही या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in