किरकोळ महागाई दर पुन्हा वधारला; ऑगस्टमध्ये ७ टक्क्यांपर्यंत

महागाई दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिलासादायक ६ टक्के पातळीच्या तुलनेत जास्त राहिला आहे
किरकोळ महागाई दर पुन्हा वधारला; ऑगस्टमध्ये  ७ टक्क्यांपर्यंत

किरकोळ महागाई दर पुन्हा वधारला आहे. ऑगस्टमध्ये हा दर ७ टक्क्यांपर्यंत राहिला असून जुलैमध्ये तो ६.७१ टक्के होता. अन्नधान्याच्या दरात वाढ झाल्याने जुलैच्या तुलनेत किरकोळ महागाईत वाढ झाली आहे.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिलासादायक ६ टक्के पातळीच्या तुलनेत जास्त राहिला आहे. सलग आठ महिने किरकोळ महागाई दर सात टक्क्यांवर राहिला आहे.

आकडेवारीनुसार अन्नधान्याचा महागाई दर ७.६२ टक्के ऑगस्टमध्ये राहिला असून जुलैमधील ६.६९ टक्क्यांच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे आणि ऑगस्ट २०२१मध्ये हा दर ३.११ टक्के होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in