कंपन्यांच्या बाजारमूल्यात कोट्यावधींची घसरण

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य ६२,१००.९५ कोटींनी घसरुन १६,२९,६८४.५० कोटी रुपये झाले
कंपन्यांच्या बाजारमूल्यात कोट्यावधींची घसरण

देशांतर्गत शेअर बाजारातील आघाडीच्या दहापैकी तीन कंपन्यांच्या बाजारमूल्यात गेल्या आठवड्यात ७३,६३०.५६ कोटी रुपयांची घसरण झाली. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीला सर्वाधिक फटका बसला. तथापि, उर्वरित सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात ४९,४४१.०५ कोटींची भर पडली. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १७९.९५ अंक किंवा ०.३४ टक्का वधारला. तर निफ्टीत ५२.८० अंक किंवा ०.३३ टक्का वाढ झाली.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य ६२,१००.९५ कोटींनी घसरुन १६,२९,६८४.५० कोटी रुपये झाले. तर आयसीआयसीआय बँकेचे मूल्य ६,६५४.२ कोटींनी घटून ४,८९,७००.१६ कोटी रुपये, हिंदुस्तान युनिलिव्हर लि.चे ४,८७५.४१ कोटींनी घसरुन ५,३६,३६४.६९ कोटी रुपये झाले.

भर पडलेल्या कंपन्यांपैकी इन्फोसिसच्या मूल्यात १५,१७२.८८ कोटींनी वधारुन ६,२१,९०७.३८ कोटी रु. झाले. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मूल्यात ११,२००.३८ कोटींची वढ होऊन ४,१६,६९०.११ कोटी झाले. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)चे ९,५१९.१२ कोटींनी मूल्य वाढून ४,२८,०४४.२२ कोटी, टीसीएसचे ८,४८९ कोटींनी वधारुन १२,१३,३९६.३२ कोटी रुपये झाले. तसेच एचडीएफसीच्या मूल्यात ३,९२४.४६ कोटींनी वधारुन ४,०१,११४.९६ कोटी झाले.

याशिवाय, भारती एअरटेलच्या बाजारमूल्यात १,०४३.४९ कोटींनी भर पडून ३,६९,८३३.१२ कोटी झाले. तर एचडीएफसी बँकेचे ९१.७२ कोटींनी भर पडून ७,५१,८९२.०३ कोटी झाले.

आघाडीच्या दहा कंपन्यांच्या क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीजने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. तर त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर लि., आयसीआयसीआय बँक, एलआयसी, एसबीआय, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांचा क्रम लागतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in