खाणमाफियांनी केली पोलीस उपअधीक्षकाच्या अंगावर ट्रक घालून हत्या

सुरेंद्रसिंग बिश्नोई असे हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी होते
खाणमाफियांनी केली पोलीस उपअधीक्षकाच्या अंगावर ट्रक घालून हत्या

अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षकाच्या अंगावर ट्रक घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना हरियाणातील नूह येथे घडली. या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर खाणमाफियांनी पळ काढला असून, त्यांना जेरबंद करण्यासाठी व्यापक शोधमोहीम उघडण्यात आली आहे.

सुरेंद्रसिंग बिश्नोई असे हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी होते. अरवली पर्वत रांगेत पाचगाव येथे अवैध पद्धतीने दगडांचे उत्खनन केले जात असल्याची गुप्त माहिती सुरेंद्रसिंग यांना मिळाली होती. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास सुरेंद्रसिंग पोलीस पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना पाहताच खाणमाफियांनी त्यांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली तसेच काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, सुरेंद्रसिंग यांनी रस्त्यात उभे राहून आरोपींना दगडांनी भरलेला ट्रक थांबवण्याचा इशारा दिला; पण आरोपींनी त्यांच्याच अंगावर ट्रक घातला. या धक्कादायक घटनेत सुरेंद्रसिंग यांचा जागीच मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in