ईडीने ताब्यात घेताच ढसाढसा रडले मंत्री; म्हणाले, "माझी..."

डीएमकेचे राज्यसभा खासदार एनआर एलांगो यांनी ईडीनं सेंथिल यांना बेकायदेशीररित्या अटक केल्याचं म्हटलं आहे
ईडीने ताब्यात घेताच ढसाढसा रडले मंत्री; म्हणाले, "माझी..."

तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे मंगळवारी ईडीनं डीएमके सरकारमध्ये उर्जा मंत्री असलेले सेंथिल बालाजी यांच्या निवास्थानी छापा टाकला. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या छापेमारीनंतर ईडीनं मंगळवारी रात्री उशिरा सेंथिल यांना अटक केली. पण यावेळी एक विचित्र घटना घडली. सेंथिल यांना अटक केली त्यावेळी ते धायमोकलून रडू लागले. आपली प्रकृती ठिक नसल्याचं ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगत होते.

यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सेंथिल बालाजी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या बालाजी यांच्या धायमोकलून रडण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सेंथिल बालाची यांच्या घरावर ईडीची धाड पल्याचं आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं कळताच द्रमुकच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. यावेळी जमलेल्या समर्थकांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सेंथिल बालाजी यांच्या घरावर ईडीनं धाड टाकत छापेमारी केल्यावर रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांना रडू कोसळलं. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना आपली तब्येत ठिक नसल्याचं सांगिल्यावर त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. हा प्रकार जेव्हा द्रमुकच्या नेत्यांना समजताच त्यांनी रुग्णालयात जाऊन सेंथिल यांची भेट घेतली. यावेळी तामिळनाडूचे मंत्री असलेले उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, ही संपूर्ण प्रक्रिया आम्ही कायदेशीररित्या हाताळू. घाबरू नका. तसंच डीएमकेचे राज्यसभा खासदार एनआर एलांगो यांनी ईडीनं सेंथिल यांना बेकायदेशीररित्या अटक केल्याचं म्हटलं आहे. सेंथिल यांना अटक करताना ईडीनं कायदेशीर प्रक्रियेचं पालन न केल्याचा आरोप एलांगो यांनी केला आहे.

तसंच सेंथिल यांच्या अटकेचा तामिळनाडूच्या कायदामंत्र्यांनीही तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले की, बालाजीला विनाकारण टार्गेट करुन त्रास दिला जात आहे, ईडी गेल्या २४ तासांपासून त्यांची चौकशी करत असून हे पुर्णपणे मानवी हक्कांच्या विरोधात आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in