दिल्लीतील 'औरंगजेब लेन' या रस्त्याचं नाव बदललं ; 'या' लोकप्रिय नेत्याच्या नावाने रस्त्याला नवी ओळख

बुधवारी एनडीएमसीच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली
दिल्लीतील 'औरंगजेब लेन' या रस्त्याचं नाव बदललं ; 'या' लोकप्रिय नेत्याच्या नावाने रस्त्याला नवी ओळख

सध्या शहरांचं नाव बदण्याचा सपाटा सुरु आहे. अशात नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने बुधवार रोजी लुटियन्स दिल्लीतल्या एका रस्त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येथील रस्त्याचं नाव 'औरंगजेब लेन' असं होतं. आता हे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव या रस्त्याला दिलं जाणार आहे. बुधवारी एनडीएमसीच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

ऑगस्ट २०१५ मध्ये एनडीएमसीने 'औरंगजेब रोड'चं नाव बदलून 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड' असं ठेवण्यात आलं होतं. पूर्व दिल्लीचे तत्कालीन खासदार महेश गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून या रस्त्याचं नाव बदलण्याची विनंती केली होती. यावरुन 'औरंगजेब रोड'ला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं होतं.

आता याठिकाणच्या लेनचं देखील नाव बदलण्यात आलं आहे. मध्य दिल्लीतील 'अब्दुल कलाम रोड' आणि 'पृथ्वीराज रोड'ला जोडण्याच काम 'औरंगजेब लेन' करते. या लेनचं औरंगजेब लेन हे नाव बदलून आता 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन' करण्याबाबतचा एक प्रस्ताव सदस्य समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला २८ जून रोजी मंजूरी देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in