सदैव युद्धसज्ज राहण्याची गरज; नौदल प्रमुखांचा अधिकाऱ्यांना सल्ला

भारतीय नौदलाने राष्ट्रीय सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सदैव युद्धसज्ज राहिले पाहिजे...
सदैव युद्धसज्ज राहण्याची गरज; नौदल प्रमुखांचा अधिकाऱ्यांना सल्ला

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने राष्ट्रीय सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सदैव युद्धसज्ज राहिले पाहिजे, असे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी म्हटले आहे. हिंदी महासागरातील आणि लाल समुद्रातील अस्थिर परिस्थिती, तसेच चीनच्या वाढत्या आक्रमक कारवायांच्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. गेल्या काही महिन्यांत तांबड्या समुद्राच्या आसपास हल्ले झाल्यानंतर भारतीय नौदलाने अनेक मालवाहू जहाजांना मदत केली आहे.

ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी नौदल मुख्यालयात नियुक्त अधिकाऱ्यांना संबोधित केले. राष्ट्रीय सागरी हितांचे कधीही, कुठेही, कसेही रक्षण करण्यासाठी सदैव लढाईसाठी तयार राहणे हे भारतीय नौदलाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच सागरी क्षेत्रातील विद्यमान आणि उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाय शोधणे, नवकल्पना आणि विशिष्ट तंत्रज्ञान स्वीकारणे या बाबींवर त्यांनी भर दिला.

logo
marathi.freepressjournal.in