नव्या करातून सरकारला कोट्यावधीचा अतिरिक्त महसूल मिळणार

तेल निर्यातीवर नुकत्याच लावलेल्या अबकारी कर अर्थात विंडफॉल टॅक्समुळे तेल कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे.
नव्या करातून सरकारला कोट्यावधीचा अतिरिक्त महसूल मिळणार

सरकारने तेल उत्पादकांच्या तेल निर्यातीवर नुकत्याच लावलेल्या अबकारी कर अर्थात विंडफॉल टॅक्समुळे तेल कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे. ओएनजीसी या सरकारी तेल कंपनीच्या नफ्यावर परिणाम होणार आहे तर रिलायन्स इंडस्ट्रीज लि. ला १२ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल इतका नफा कमी होणार आहे. तथापि, सरकारला या करातून १.३ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सरकारने अचानक सोन्याच्या आयातीवरही १ जुलैपासून आयात शुल्क ५ टक्के वाढवले तर पेट्रोल, डिझेल आणि विमानाचे इंधन असलेल्या एटीएफवर अनुक्रमे १३ रु. प्रति लिटर, २६ अमेरिकन डॉलर्स/बीबीएल) आणि विंडफॉल टॅक्स देशांतर्गत क्रूड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर २३,२५० प्रति टन, ४० डॉलर्स/बीबीएल) आकारला जाईल. त्याचबरोबर स्टीलवर १५ टक्के आणि लोह आयातीवर २० ते ४५ टक्के ड्युटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in