राष्ट्रीय
खलिस्तानचा प्रश्न मोदींनी उकरून काढला न्यूयॉर्क टाइम्सचा आरोप
मोदींनी २०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खलिस्तानचा प्रश्न नाहक उकरून काढला आहे
नवी दिल्ली : खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्तित्वात नसलेल्या शीख फुटीरतावादाचा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, विश्लेषक, राजकीय नेते आणि रहिवाशांचे म्हणणे आहे की पंजाबमध्ये स्वतंत्र शीख राज्याच्या स्थापनेला फारसा पाठिंबा नाही. पण, मोदींनी २०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खलिस्तानचा प्रश्न नाहक उकरून काढला आहे. हे केवळ निवडणुकीचे राजकारण असून मोदी हे निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा आरोपही न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे.