धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेमध्ये काँग्रेसने सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे.
जगदीप धनखड
जगदीप धनखडसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेमध्ये काँग्रेसने सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे.

उपसभापती हरिवंश यांनी राज्यसभा सभापतींविरोधात आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर निर्णय देताना सांगितले की, वैयक्तिक पूर्वग्रह ठेवून आणण्यात आलेल्या या नोटिशीमध्ये तथ्यांचा अभाव आहे. तसेच तिचा उद्देश केवळ प्रसिद्धी मिळवणे एवढाच आहे. तसेच ही नोटीस म्हणजे सर्वात मोठ्या लोकशाहीमधील उपराष्ट्रपतींच्या उच्च अविश्वास प्रस्ताव फेटाळला

घटनात्मक पदाला जाणीवपूर्वक अपमानित करण्याचा केलेला प्रयत्न होता. सभापती धनखड यांनी या नोटिशीवर निर्णय घेण्यापासून स्वत:ला बाजूला केले होते. त्यानंतर या नोटिसीवर निर्णय देण्याची जबाबदारी ही उपसभापतींकडे देण्यात आली होती.

उपराष्ट्रपतींची बदनामी करण्याच्या कटाचा भाग

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांच्यावतीने सभागृहात सादर करण्यात आलेल्या आपल्या निर्णयात राज्यसभेच्या उपसभापतींनी सांगितले की, महाभियोगाची नोटीस ही देशाच्या घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचा आणि विद्यमान उपराष्ट्रपतींची बदनामी करण्याच्या कटाचा भाग होती.

logo
marathi.freepressjournal.in