सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या घटली

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या अहवालात ही माहिती दिली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या घटली

मागील पाच वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये २५ हजारांहून अधिक कर्मचारी कमी झाले आहेत. तर याच काळात खासगी बँकांमध्ये १.१३ लाखांची वाढ झाली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या अहवालात ही माहिती दिली आहे.

२०१८ मध्ये २१ सरकारी बँकांमध्ये एकूण २०१८ मध्ये एकूण संख्या ६,१५,१४४ कर्मचारी होते तर २०२२ मध्ये ५,८९,३२० कर्मचारी राहिले. या काळात देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने सर्वाधिक १९,७९१ कर्मचारी गमावले. त्यांची संख्या २.६४ लाखांवरून २.४४ लाखांवर आली आहे. २०१८ मध्ये २१ खाजगी बँकांमध्ये ४.२० लाख कर्मचारी होते. तर २०२१ मध्ये त्यांची संख्या ५.३४ लाखपर्यंत वाढली. बॅंक एम्प्लॉईज संस्थेच्या वतीने काही खाजगी बँकांनी २०२२ ची आकडेवारी दिली आहे. यामध्ये एचडीएफसी बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे २१ हजारांनी आणि अक्सिस बॅंकेत ७.५ हजारांनी वाढली आहे. एसबीआयमध्ये २०१८ मध्ये २,६४,०४१२ तर २०२२ मध्ये २,४४,२५० कर्मचारी राहिले. तयामुळे या बँकेतील १९,७९१ कर्मचारी झाले कमी. पीएनबी ही सरकारी एकमेव बँकेत २०१८ मध्ये १,०१,८०२ कर्मचारी होते. ते २०२२ मध्ये १,०३,१४४ झाले. अर्थात १३४२ कर्मचारी वाढले. मात्र, कॅनरा बँकेत २०१८ मध्ये ८८,२१३ कर्मचारी होते. २०२२ मध्ये ती संख्या ८६,९१९ झाल्याने १२९४ कर्मचारी कमी झाले. बँक ऑफ बडोदामध्ये २०१८ मध्ये ८२,८८६ कर्मचारी होते, २०२२ मध्ये ही संख्या ७९,८०६ झाल्याने ३,०८० कर्मचारी कमी झाले. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ७८,२०२ कर्मचारी २०१८ मध्ये होते तर २०२२ ही संख्या ७५,२०१ झाल्याने ३,००१ कर्मचारी कमी झाले. त्यामुळे २०१८ मध्ये एकूण संख्या ६,१५,१४४ कर्मचारी होते तर २०२२ मध्ये ५,८९,३२० कर्मचारी राहिले. हे पाहता २५,८२४ कर्मचारी कमी झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in