प्रचार साहित्यासाठी भरा ५० हजार रुपये; ओदिशा प्रदेश काँग्रेस समितीचे इच्छुक उमेदवारांना निर्देश

उमेदवारीसाठी जे कमी इच्छुक आहेत, त्यांना याद्वारे दूर ठेवण्यास मदत होईल, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. यासंदर्भात शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसोबत वन-टू-वन बैठक पुरी येथील एका हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली तेथे पक्षाने निवडणूक व्यूहरचनेवरही चर्चा केली.
प्रचार साहित्यासाठी भरा ५० हजार रुपये; ओदिशा प्रदेश काँग्रेस समितीचे इच्छुक उमेदवारांना निर्देश

भुवनेश्वर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविताना प्रचार साहित्य पुरवठ्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करावेत, असा निर्देशच ओदिशा प्रदेश काँग्रेस समितीने (ओपीसीसी) दिला आहे.

ओदिशा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सरत पट्टनायक यांनी यासंदर्भात संभाव्य उमेदवारांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या वतीने निवडलेल्या उमेदवारांकडून ५० हजार रुपयांचा धनादेश स्वीकारण्यास पक्ष तयार आहे. उमेदवारांना समतुल्य मूल्याचे ब्रँडिंग आणि प्रचार साहित्य पुरवण्यासाठी ही रक्कम असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

हा धनादेश ओपीसीसीच्या बाजूने असेल आणि कोणत्याही वैयक्तिक नेत्याच्या नावावर नाही. पक्षाला १४७ विधानसभा जागांसाठी आणि २१ लोकसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांकडून सुमारे तीन हजार अर्ज प्राप्त झाले होते. पट्टनायक यांनी निवडलेल्या उमेदवारांची संख्या व रक्कम भरलेल्यांची नावे काही त्यांनी जाहीर केेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने उमेदवारांकडून निधी गोळा करण्याचे समर्थन केले आणि प्रचारादरम्यान निवडणूक साहित्याचा सुरळीत प्रवाह व्हावा यासाठी ही मागणी केली जात असल्याचे सांगितले.

उमेदवारीसाठी जे कमी इच्छुक आहेत, त्यांना याद्वारे दूर ठेवण्यास मदत होईल, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. यासंदर्भात शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसोबत वन-टू-वन बैठक पुरी येथील एका हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली तेथे पक्षाने निवडणूक व्यूहरचनेवरही चर्चा केली. याशिवाय इच्छुकांनी प्रचाराचे साहित्य मिळत नसल्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे लक्ष वेधले होते. इच्छुक उमेदवारांकडून मिळालेले पैसे प्रचार साहित्य पुरवण्यासाठी वापरण्यात येतील. उमेदवार निश्चित झाल्यानंतर ज्या इच्छुकांना तिकीट मिळणार नाही त्यांना धनादेश परत केले जातील, असेही पटनायक म्हणाले.

पक्षासाठी योगदान...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार तारा प्रसाद बहिनिपती यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, काँग्रेस उमेदवारांना पक्षासाठी काही बलिदान द्यावे लागेल. चेक अधिकृतपणे स्वीकारले जात आहेत आणि लपविण्यासारखे काहीही नाही. पक्षाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे उमेदवारांना काही त्याग करावा लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in