तिरुपती देवस्थानमचा प्रसाद शुद्धच

तिरुपती देवस्थानममधील प्रसादाच्या लाडूंची शुद्धता व पावित्र्य सुनिश्चित करण्यात आले असून हा प्रसाद शुद्धच आहे, अशी ग्वाही तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या व्यवस्थापनाने दिली आहे.
तिरुपती देवस्थानमचा प्रसाद शुद्धच
Published on

तिरुपती : तिरुपती देवस्थानममधील प्रसादाच्या लाडूंची शुद्धता व पावित्र्य सुनिश्चित करण्यात आले असून हा प्रसाद शुद्धच आहे, अशी ग्वाही तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या व्यवस्थापनाने दिली आहे. प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळयुक्त तूप आणि प्राण्याची चरबी आढळून आल्याचा आरोप करण्यात आला होता.

श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानमने याबाबत समाज माध्यमांवर पोस्ट प्रसिद्ध केली आहे. व्यवस्थापनाने म्हटले आहे की, मंदिराचा प्रसादाचा लाडू पूर्णपणे दोषरहित असून प्रसादाच्या शुद्धतेबाबत स भाविकांना कोणतीही शंका घेण्याची आवश्यकता नाही. प्रसादाचे पावित्र्य व शुद्धता अबाधित राखण्यासाठी मंदिराचे त व्यवस्थापन बांधिल आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपतीच्या लाडूच्या प्रसादात भेसळयुक्त तूप आणि प्राण्याच्या चरबीचे अंश आढळून आल्याचा सर्वप्रथम आरोप केला होता. मंदिराच्या व्यवस्थापनानेही प्रसादात भेसळयुक्त पदार्थ आढळून आल्याचे मान्य करीत चंद्राबाबू यांच्या आरोपाला दुजोरा दिला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री व वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू लोकांचे लक्ष्य मूळ मुद्द्यांवरून वेगळीकडे वळवण्यासाठी खोटे आरोप करीत असल्याचे म्हटले होते.

'अमूल घी'च्या वापराची अफवा पसरविणाऱ्यांविरोधत गुन्हा

तिरुपती देवस्थानमच्या लाडूच्या प्रसादात वापरलेले निकृष्ट दर्जाचे तूप हे 'अमूल' या प्रसिद्ध ब्रँडचे असल्याचा अपप्रचार काही लोकांकडून समाज माध्यमांवर केला जात होता. यांपैकी काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अहमदाबाद पोलिसांनी दिली. 'एक्स' नया समाज माध्यमावर ही पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. लाडूच्या प्रसादामध्ये अमूल घी वापरण्यात आल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in