जुनं संसद भवन बनलं 'संविधान भवन', लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचं शिक्कामोर्तब

जुन्या संसद भवनात वापरण्यात येणाऱ्या काही संज्ञा देखील नव्या संसद भवनात वापरण्यात येणार आहेत, अशी घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज केली.
जुनं संसद भवन बनलं 'संविधान भवन', लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचं शिक्कामोर्तब

भारताच ऐतिहासिक जुनं संसद भवन आता 'संविधान सदन' म्हणून ओळखलं जाणार आहे. त्याच बरोबर या जुन्या संसद भवनात वापरण्यात येणाऱ्या काही संज्ञा देखील नव्या संसद भवनात वापरण्यात येणार आहेत, अशी घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज केली.

ओम बिर्ला म्हणाले की, "आपण सकाळी ज्या सदनात जमलो तो ते आता संविधान सदन म्हणून ओळकलं जाईल. त्याच बरोबर लोकसभेच्या कामकाजात वापरले जाणारे हाऊस, लॉबी आणि गॅलरीज हे शब्दही यापुढे नव्या भवनात जी भारताची संसद आहे. त्याठिकाणी वापरले जातील."

पंतप्रधान मोदींची सुचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी जुन्या संसद भवनातील सेन्ट्रल हॉलमध्ये भाषण करताना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, तसंच दोन्ही सभागृहातील नेते यांना सूचना केली की, जर तुमची संमती असेल तर आपण नव्या संसद भवनात दाखल होताना जुन्या संसदचं पावित्र्य कमी होता कामा नये, साकरिता ज्या ठिकाणी संविधान सभेनं मोलाचं कार्य केलं. त्या जुन्या संसद भवनाला 'संविधान सदन' म्हणून ओळखलं जावं.

logo
marathi.freepressjournal.in